जिवंत बाळाला बॅगेत भरले आणि... नवी मुंबईत घडली धक्कादायक घटना
नवी मुंबईत जिवंत बाळाला बॅगेत भरुन रुग्णालयात सोडण्यात आले आहे. हा सर्व प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
Navi Mumbai Crime News : नवी मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. जिवंत बाळाला बॅगेत भरुन सोडून देण्यात आले आहे. बाळाच्या रडण्याचा आवाज आल्यानंतर या बॅगेत काय आहे ते उघडकीस आले. मात्र, बाळ असलेली बॅग ठेवून गुपचूप पलायन करणारा व्यक्ती CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
नवी मुंबईतीस घणसोली येथील सेक्टर 3 लक्ष्मी हॉस्पिटल आणि वनलाईट फिटनेस हब यामध्ये असलेल्या कॉमन जागेमध्ये ही बाळ असलेली बॅग ठेवण्यात आली. बॅग मध्ये पाच दिवसाच्या नवजात बालिकेला सोडून गेल्याची घटना घडली आहे.
काय आहे CCTV फुटेजमध्ये
बॅग सोडून जातानाची ही घटना सीसीटीव्ही मद्ये कैद झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास या बाळाला बंद अवस्थेत असलेल्या बॅग मद्ये ठेवण्यात आले होते. लक्ष्मी हॉस्पिटल आणि वनलाईट फिटनेस हब यामध्ये असलेल्या कॉमन जागे असलेल्या रॅकमध्ये बाळ असलेली बॅग ठेवण्यात आली. बॅग ठेवून एक व्यक्ती निघून गेल्याचे या व्हिडिओत दिसत आहे.
बाळाचा रडण्याचा आवाज आला
बाळाचा रडण्याचा आवाज आल्यावर आजूबाजूच्या लोकांना याबाबत कळले त्यांनी. बॅगेतून आवाज येत होता. नागरीकांनी बॅग उघडून पाहिली असताना जिवंत बाळ दिसले. नागरिकांनी तात्काळ पोलिसांना बोलावून घेतले. पोलिसांनी बाळाला रुग्णालयात नेले त्याची वैद्यकीय तपासणी झाल्यावर बाळाला नेरुळ मधील विश्व बाळ केंद्रात ठेवण्यात आले ,असून कोपरखौरनणे पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
नवी मुंबईत कचराकुंडीत आढळले नवजात अर्भक
नवी मुंबईतल्या तुर्भे इंदिरानगरमध्ये मनपा रूग्णालयाशेजारील कचराकुंडीत नवजात अर्भक आढळले होते. सकाळी कचरा नेण्यासाठी पालिकेचे कर्मचारी आले असता त्यांना हे अर्भक दिसलं...त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं मात्र त्याच मृत्यू झाला होता.
अर्भकाला नाल्यात फेकले
पिंपरी चिंचवडच्या बालाजीनगर भागातल्या नाल्यात एका अर्भकाला फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघड झाली. मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांना नाल्यात कुत्रे काही तरी खात असल्याचं जाणवलं म्हणून पोलिसांना बोलवण्यात आलं. पोलिसांनी पाहाणी केल्यानंतर अर्भक असल्याचं उघड झालं.