रत्नागिरी :ओव्हरटेक करणाऱ्या मारुती डिझायर कारला वाचविण्याच्या प्रयत्नात खासगी आरामबसला मुंबई-गोवा माहामार्गावर भोस्ते घाटात अपघात झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चालक उपेंद्र कावजीनं आपले सारे कौशल्य पणाला लावून, सुमारे १५० फूट खोल दरीत कोसळणारी बस नियंत्रीत केल्याने फार मोठा मात्र अनर्थ टळला.  पेण तालुक्यातील मळेघर येथील भाविक, आनंद ट्रॅव्हल्सच्या खासगी आरामबसने ५ दिवसांच्या देवदर्शन यात्रेवर गेले होते. 


यात्रा आटोपून बुधवारी परतीच्या प्रवासाला निघालेले असताना सायंकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास ही बस भोस्ते घाटात आली.अचानक समोरुन ओव्हरटेक करत भरधाव येणारी मारुती डिझायर बस चालक उपेंद्र कावजीला दिसली. कारला वाचविण्यासाठी त्याने बस डाव्या बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. आणि बस दरीच्या बाजुला असलेल्या कठड्यावर आदळली. 


बस दरीत कोसळणार हे लक्षात आल्यावर कावजीने सारे कौशल्य पणाला लावलं आणि बस जागीच नियंत्रित केली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. बस नियंत्रणात आली नसती तर, सुमारे दीडशे फूट खोल दरीत कोसळली असती.डिझायरच्या कार चालकाला पोलिसांनी कारसह ताब्यात घेतलं आहे.