रायगड : मुंबई - पुणे एक्स्प्रेसवर (Mumbai-Pune highway) मध्यरात्री एक धक्कादायक घटना घडली. चालत्या बसला अचानक आग (bus caught fire) लागल्याने आगीचे तांडव पाहायला मिळाले. यात बस जळून खाक झाली. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर (Mumbai-Pune highway) मध्‍यरात्री १ वाजण्‍याच्‍या सुमारास धावत्‍या खासगी लक्‍झरी बसला आग (private bus caught fire ) लागली. मात्र, बसमध्ये चालक असल्याने मोठी दुर्घटना टळली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खालापूर टोलनाक्‍यापासून दोन किलोमीटर अंतरावर मुंबई लेनवर ही घटना घडली. आयआरबी टीमचे दोन आणि खोपोली नगरपालिकेच्‍या एक अग्‍नीशमन पथकाने प्रयत्‍न करून आग अटोक्‍यात आणली असली. मात्र, बस जळून पूर्णपणे खाक झाली आहे .


सुदैवाने बसमध्‍ये कोणीही प्रवासी नव्‍हते त्‍यामुळे मोठा अनर्थ टळला. चालकाला कुठलीही इजा झाली नसून तो सुखरूप आहे. शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागल्‍याचं सांगितले जात आहे .  महामार्गावर वाहनांना आगी लागण्याच्या घटना अलीकडच्या काळात वाढत चालल्या असून तो चिंतेचा विषय बनला आहे.