अरे व्वा! काश्मिरच्या केशराची महाराष्ट्रात शेती; अर्ध्या एकरात लाखोंचं उत्पादन
Pune Kesar Farming in container : भारतासारख्या देशात केशरचे पीक काश्मीर राज्यामध्येच (kashmiri keshar) मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. तिथल्या पोषक वातावरणात हे पीक येत असल्याने त्याला जगभरातून चांगली मागणी देखील आहे. मात्र कश्मीरमध्ये मिळणाऱ्या केशरची चक्क पुण्यात शेती (pune news) केली जात आहे.
सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे: भारतासारख्या देशात केशरचे पीक काश्मीर राज्यामध्येच (kashmiri keshar) मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. तिथल्या पोषक वातावरणात हे पीक येत असल्याने त्याला जगभरातून चांगली मागणी देखील आहे. मात्र कश्मीरमध्ये मिळणाऱ्या केशरची चक्क पुण्यात शेती (pune news) केली जात आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शैलेश मोडक (shaliesh modak) या तरुणाने हा भन्नाट प्रयोग केला आहे. यात आणखी विशेष म्हणजे ही केशरची शेती त्याने चक्क कंटेनरमध्ये (cantainer) केली आहे. त्याला कंटेनर फरमिंग असेही म्हणतात. शैलेश हा मूळचा नाशिकचा राहणारा असून गेल्या काही वर्षांपासून तो पुण्यात स्थायिक आहे. शैलेशच्या या आगळ्या वेगळ्या शेतीची चांगलीच चर्चा होऊ लागली आहे. राज्यातलं पहिलं कंटेनर बिन मातीची शेतीचा हा पहिला प्रयोग आहे. (A Pune Farmer Started Saffron Farming in Container Without Soil Latest News Marathi)
केशर हे तोळ्यावर विकले जाते. केशरचे महत्त्व भारतीय अन्न पदार्थात मोलाचे स्थान आहे. प्रतिग्रॅम 300 ते 1500 रुपयांपर्यंत याची विक्री केली जाते. त्याच्या दर्जानुसार केशरचा भाव आपल्याला बाजारात पाहायला मिळतो. काश्मीर, हिमाचल प्रदेश आदी थंड आणि बर्फाळ प्रदेशात केशरचे (production) उत्पादन केले जाते. त्यामुळे केवळ मागणीच्या फक्त 3 ते 4 टक्केच उत्पादन भारतात घेतले जाते. या सर्व गोष्टींचा विचार करून मोडक यांनी हा कंटेनर फार्मिंगचा प्रयोग पुण्यात राबवला असून तो यशस्वी देखील केला आहे.
कशी केली हे आधुनिक शेती
शैलेश यांनी हे पीक एका कंटेनरमध्ये घेतल्याने त्याचे आकर्षण आणखी वाढले आहे. गेल्या सहा वर्षांपासून ते हा प्रयोग राबवत आहेत. एअरपोनिक (airponic) पद्धत वापरून हा यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे. 320 वर्गफुटाच्या कंटेनरमध्ये केशराची लागवड करून त्यासोबत इतर भाज्यांचे पीक घेतले आहे. यात वेगवेगळ्या औषधी वनस्पती, परदेशी भाज्या, मसाले या पिकांना पर्याय शोधत शैलेश मोडक यांनी केशर हे पीक घेण्याचे ठरविले. 'प्राथमिक प्रयोगासाठी काश्मीर मधील पँम्पोरमधुन (keshar) बारा किलो केशरचे कंद मी मागविले. त्यानतंर या कंदाच्या वाढीसाठी नियंत्रित पध्दतीने कंटेनरमध्ये तापमान ठेवले. यात त्याला हे कंद वाढत असल्याचे दिसल्यानतंर परत काश्मीरला जाऊन त्याने तिथल्या शेतकर्यांशी संवाद साधला', अशी माहिती शैलेशनं दिली.
काय आहे आधुनिक तंत्रज्ञान
काही दिवस तिथे राहून केशर पिकाच्या लागवडीची पद्धत समजून घेतली. त्यानंतर सुरुवातीला कंटेनरमध्ये केशर लावण्याचा निर्णय शैलेश यांनी घेतला. त्यानुसार कंटेनरमध्ये केशर लावले. तसेच काश्मीर प्रमाणे कंटेनरमध्ये तापमान नियंत्रित करण्याकरता (advanced technology) एअर सर्क्युलेटर, चिलर, एसी, डीह्युमिडिफायर, आद्रता कमी - जास्त करण्याकरता चारकोल वर आधारीत तंत्र अशा विविध तंत्रज्ञानाचा वापर शेलेशने या कंटेनरमध्ये तयार करण्यात आला. तसेच कृत्रिम प्रकाश संश्लेषणाकरता त्याच्या अवस्थेनुसार लाल, पांढरा आणि निळ्या रंगाचा प्रकाशही याठिकाणी पुरविला जातो. सध्या शैलेश यांनी पुण्यातील वारजे परिसरात हा कंटेनर तयार केला असून एका ट्रेमध्ये आकारानुसार चारशे ते सहाशे कंद बसवले जातात.
मदतीची साथ
सध्या अर्ध्या कंटेनरमध्ये सुमारे पाचशे किलो कंदाची वाढ करता येणार आहे. त्यापासुन सुमारे एक ते सव्वा किलो केशर मिळण्याची आशा शैलेश यांनी व्यक्त केली आहे. सद्या केशरचा प्रति ग्रँम हा 499 इतका दर आहे. बाजारभावानुसार याचा दर किलोला 6 लाख 23 हजार 750 इतका आहे. कंटेनर तयार करण्यापासुन ते कंद आणण्यापर्यत आठ लाख इतका शौलला खर्च आला असल्याचे शैलेश यांनी सांगितले आहे. या कंटेनर फार्मसाठी मित्र व सहसंस्थापक डॉ.राहुल ढाके, किरण बोंडे, भाऊ प्रशांत मोडक व डॉ हितेश मोडक, वडील किशोर मोडक, आई स्मिता मोडक, पत्नी कविता मोडक, स्व.डॉ विकास खैरे अंजीर तज्ज्ञ यांच्या मार्गदर्शनामुळे आज हे कंटेनर फार्म उभे राहिले असल्याचे शैलेश यांनी सांगितले आहे.
ही शेती पाहण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी येत आहे. हा कंटेनर फार्मिंगचा आगळा वेगळा प्रयोग सर्वांच्याच कौतुकाचा विषय ठरत आहे. आजच्या युवा शेतकऱ्याने देखील आधुनिक शेतीकडे उतरावे आणि शेतीचे वेगळे प्रयोग करून आधुनिक शेती करावी अशी अपेक्षा शैलेश मोडक यांनी व्यक्त केली आहे.