मुंबई : Dogs Successful Surgery : रस्ता अपघातामुळे एका श्वानाला अपंगत्व आले. मात्र, त्याच्यावर उपचार करण्याची गरज होती. त्यासाठी प्राणी प्रेमी मदतीसाठी धावून आलेत. त्यांनी उपाचारासाठी मदतनीती गोळा गेला. त्यामुळे श्वानाला प्राणी प्रेमींचा मदतनिधीने पुन्हा धावता आले आहे. माणसांचे प्राणीप्रेम या निमित्ताने पुन्हा अधोरेखीत झाले. (Old Paralyzed Dogs Due To Road Accident Walks Again After Successful Surgery)


पुण्यातील स्मॉल अ‍ॅनिमल क्लिनिकचेपशुवैद्यकीय सर्जन डॉ. नरेंद्र परदेशी यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या टीमने रस्ता अपघातात कंबरेखालील भाग लूळा पडलेल्या सात वर्षांच्या मादी कुत्र्याला यशस्वीरित्या जीवनदान दिले. प्राणी प्रेमींनी या शस्त्रक्रियेसाठी लागणारा मदतनिधी गोळा केला असून नुकतीच कुत्र्याच्या पाठीच्या कण्याची शस्त्रक्रिया आणि फिजिओथेरपी यशस्वीरित्या पार पडली. या कुत्र्याने उपचारांना चांगला प्रतिसाद दिला आणि तो पूर्वीप्रमाणेच चालू लागला आहे.
 
पुणे येथे एका वाहनाने धडक दिल्याने या सात वर्षीय कुत्रीचा (सिमरन) अपघात झाला. परिसरातील बांधकाम व्यावसायिक आणि प्राणी प्रेमी अमर तलरेजा यांनी सिमरनला खायला दिले जाते, तिला जखमी अवस्थेतून शुद्धीत आणण्याचा प्रयत्न केला पण मागच्या दोन्ही पायांच्या अर्धांगवायूमुळे तिला हालचाल करता येत नव्हती. सिमरन ही या परिसरातील प्रत्येकाला प्रिय आहे. जवळच्या कॅफेमध्ये येणारे बहुतेक लोक तिला खायला घालायचे. तिची अवस्था पाहून मला प्रचंड वेदना झाल्या. अनेकांना तर ती पुन्हा चालू शकेल याची अपेक्षा देखील नव्हती.तरी देखील तलरेजा यांनी कुत्र्याचा जीव वाचवण्याचा निर्धार केला आणि डॉ नरेंद्र परदेशी यांच्याशी संपर्क साधला ज्यांनी कुत्र्याला पुन्हा तिच्या पायावर उभे राहण्यास मदत केली.
 
गाडीने धडकलेल्या सिमरनला पाहून तिला नवीन आयुष्य दिल्याबद्दल मी डॉ परदेशी आणि त्यांच्या टीमचे आभार व्यक्त केले जात आहेत. डॉ परदेशी यांनी कोणतेही सल्ला शुल्क घेतले नाही तसेच कोणतीही अतिरिक्त रक्कम घेतली नाही. तिच्या उपचाराकरिता अनेकांनी मदत केली, अशी माहिती अमर तलरेजा  यांनी दिली.