प्रवीण तांडेकर, झी मीडिया, भंडारा: आतापर्यंत शेतशिवारात धुमाकूळ घालणा-या हत्तींनी प्रथमच गावात प्रवेश करून तीन घरांच्या भिंती पाडून तोडफोड केल्याचा प्रकार भंडारा (bhandara) जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील दहेगाव माईन्स येथे मध्यरात्रीच्या (midnight) सुमारास घडला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती होताच वन कर्मचा-यांनी गावात धाव घेऊन हत्तींना जंगलाच्या दिशेन हाकलून लावले. या प्रकाराने गावात भीतीचे वातावरण आहे. मध्यरात्रीच्या दहेगाव येथे शिरलेल्या हत्तींनी निताराम कुंडलिक करणकर, रामा यादवराव इरपाते, विठ्ठल जना कुंभरे, रामा यादवराव इरपाते (70) यांच्या घराची भिंत पाडून नुकसान केले आहे..विशेष 70 वर्षीय दिव्यांग असेलेले रामा त्यावेळी भिंतीला लागूनच खाटेवर झोपले होते, प्रसंगी वृद्धाच्या मुलाने आरडाओरडा केल्याने हत्ती पळून गेले. सुदैवाने रामा यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आता वनविभागाने पंचनामे करत नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे. (a swamp of elephants destroy houses in villages in bhandara)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भंडाऱ्यात अनेकदा हत्तीचा हैदोस
 
गडचिरोली आणि गोंदिया (gondia and gadchiroli) जिल्ह्यानंतर हत्तीचा कळप भंडारा जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर या हत्तीचा संचार साकोली तालुक्यातील मोहघाटा जंगलात वाढला होता. हत्तींवर वॉच ठेवण्यासाठी वनविभागाचे विविध पथके जंगलात तैनात होते. पश्चिम बंगालच्या सेज संस्थेच्या हत्ती नियंत्रण पथकाचीही मदत घेतली गेली असून वरिष्ठ वनाधिकारी मोहघाटा जंगलात तळ ठोकून आहेत. साकोली तालुक्यातील सानगडी वनपरिक्षेत्रात सोमवारी हत्तींचा कळप दाखल झाला. या कळपाने झाडगाव, केसलवाडा, सिलेगाव शेतशिवारातील धान आणि ऊस पिकांचे नुकसान केले. दरम्यान, मंगळवारी हत्तीचा कळप मोहघाटा जंगलात (jungle) पोहोचला. मोहघाटा जंगलात वनविभागाचे भंडारा व गोंदिया येथील जलद प्रतिसाद दल, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे पथक तळ ठोकून आहेत. मोहघाटा जंगलात असलेले हत्ती मानवी वस्तीत शिरणार नाही, याची दक्षता वनविभागाकडून (forest department) घेतली जात आहे. भंडारा वनविभागाचे सुमारे 60 कर्मचारी जंगल परिसरात तैनात आहेत. ड्रोन कॅमेऱ्याद्वारे हत्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.  



16 जनवरांची सुटका आणि 7 लाख 60 हजार रूपयांच्या माल पकडला


धानाच्या पोत्या मागे जनावरे घेऊन जाणाऱ्या वाहनाला भंडारा जिल्ह्याच्या तुमसर चंगेरा मार्गावर पकड़ले असून यातून कत्तलि साठी जाणाऱ्या 16 जनवरांची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी तुमसर पोलिसांनी 7 लाख 60 हजार रूपयांच्या माल पकडला आहे. तुमसर पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केल्याचे समोर आले आहे.