Crime News: चिकू का तोडला? महिलेने जाब विचारल्याने गुंड घरात घुसला अन्...; नाशिकमधील धक्कादायक घटना
Crime News: नाशिकमध्ये (Nashik) गावगुंडाने थेट घरात घुसून महिलेवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. चिकू तोडल्याचा जाब विचारल्याने गुंडाने घरात घुसून महिलेला मारहाण केल्याने परिसरात भीतीचं वातावरण आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाला आहे.
Crime News: नाशिकच्या (Nashik) सिडको (Cidco) परिसरात एका महिलेवर गुंडाने घरात घुसून हल्ला (Woman Attacked) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकच्या सिडको परिसरातील हनुमान चौक शॉपिंग सेंटर येथे ही घटना घडली आहे. महिलेने झाडावरील चिकू तोडण्यापासून झटकल्याने गुंडाने घरात घुसून महिलेवर हल्ला केला. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाला आहे.
नेमकं काय झालं?
सिडको परिसरात राहणाऱ्या महिलेने घराच्या अंगणाबाहेरील झाडावरील चिकू तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या गावगुंडास हटकलं होतं. यानंतर त्याने घराचा सुरक्षा दरवाजा ओलांडून घरात शिरून महिलेवर हल्ला केला. ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
महिलेनेही यावेळी न घाबरता मोठ्या हिमतीने त्याचा विरोध केला. महिलेची आरडाओरड ऐकून शेजारील नागरिक जमा झाले. यानंतर गावगुंडाने सदर महिलेस धमकावत तेथून पळ काढला. या हल्ल्यात महिला किरकोळ जखमी झाली आहे. तसंच महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मनात गावगुंडाची दहशत निर्माण झाली आहे.
सिडको परिसरात गावगुंडांचा हैदोस दिवसेंदिवस वाढत असून या घटनेमुळे भीतीचं वातावरण आहे. आथा गावगुंडांची मजल अगदी छोट्या कारणांवरून थेट घरात घुसून महिलांवर हल्ला कारण्यापर्यंत पोहोचली असल्याची चर्चा सुरु आहे. तसंच गावगुंडांवर पोलिसांचा वचक उरला नसून पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.