पुणे : शिरूर तालुक्यातील (Shirur taluka ) न्हावरे येथील महिलेचा विनयभंग ( woman Molestation) करून तिच्या डोळ्यांना मोठी ईजा केली होती. त्या महिलेचे दोन्ही डोळे निकामी झाले आहेत. या महिलेवर पुण्यात उपचार सुरु आहेत. दरम्यान, राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी पीडित महिलेची भेट घेतली. त्यांना १० लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिरूर तालुक्यातील न्हावरे गावात ३ नोव्हेंबर रोजी शौचास गेलेल्या महिलेचा विनयभंग करण्यात आला होता. क्रुर आरोपीने महिलेचे दोन्ही डोळे बाहेर काढल्याचा दुर्दैवी प्रकार घडला होता. या घटनेत पीडित महिलेचे दोन्ही डोळे निकामी झाले आहे. या महिलेवर सध्या पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


या पीडित महिलेची राज्यमंत्री बच्चू कडू यांनी ससून रूग्णालयात जावून भेट घेतली. पीडित महिलेला दिवाळीपूर्वी राज्य सरकारकडून महिला बालकल्याण विभागाच्या मनोधैर्य योजनेतून कमीत कमी १० लाख रुपयांची मदत केली जाणार आहे. नुसता पैशाने हा प्रश्न सुटणार नसून महिलेचे दोन्ही डोळे निकामी झाल्याने पुढच्या काळात महिलेला सरकारच्या महिला बालकल्याण विभागाच्या विविध योजनांनमधून मदत केली, जाईल असे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले.