नवी मुंबई : सुरेखा विजय माने ही महिला हॉस्पिटलसमोर उभी राहून मदत मागतेय, यासाठी या महिलेने फेसबूक लाईव्ह केलं आहे. पनवेलमध्ये भटक्या कुत्र्यांसाठी तसेच प्राण्यांसाठी असलेल्या हॉस्पिटलसमोरून, रस्त्यावरच्या कुत्र्यांच्या उपचारासाठी ही महिला मदत मागतेय.


भटक्या कुत्र्यांवर इलाज करण्यास नकार- महिलेचा आरोप


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


विशेष म्हणजे या महिलेने आणखी एक गंभीर आरोप केला आहे की,  फक्त खासगी म्हणजेच लोकांनी पाळलेल्या कुत्र्यांवरच येथे औषधोपचारावर जोर आहे, भटक्या कुत्र्यांकडे दुर्लक्ष केलं जातं, उपचार करण्यास नकार दिला जातो.


प्रेक्षकांना आवाहन


या महिलेच्या व्हिडीओची बातमी तुमच्या फेसबूकवर किंवा ट्ववीटरवर #BhooBhooCrying हॅशटॅग वापरून शेअर करा, यामुळे जास्तच जास्त लोकांपर्यंत, ही तक्रार पोहोचेल आणि संबंधित यंत्रणेला कारवाई करावीच लागेल.


याला नेमकं जबाबदार कोण? हवीय मदत


हा व्हिडीओ झी २४ तासला फेसबूक लाईव्ह मधून दिसून आला आहे, संबंधित हॉस्पिटलमधील डॉक्टर किंवा जबाबदार व्यक्तीची, नेमकी बाजू अजून समोर आलेली नाही. मात्र या महिलेने रस्त्यावरील या कुत्र्यांना नवी मुंबईत कुठे उपचार मिळतील आणि मी कुठे या विषयी तक्रार करू, अशी मदत मागितली आहे.