मुंबई : 'तुमच्याकडे पैलवान असतील, मला त्याबद्दल काही म्हणायचं नाही', असं म्हणत वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी पक्षप्रमुख शरद पवार यांनी साताऱ्यामधील एक सभा खऱ्या अर्थानं गाजवली होती. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला खुलं आव्हान देणाऱ्या शरद पवारांचा राजकारणातील सर्व अनुभव आणि त्यांना असणारी जनमानसातील पसंती या एका सभेनं दाखवून दिली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वरुण राजाचं रुप पाहता वर्षभरापूर्वी प्रचारसभांना वेग आलेला असतानाच अनेक बड्या राजकीय नेतेमंडळींना सभा आवरत्या घ्याव्या लागल्या होत्या. काहींना सभा रद्दही कराव्या लागल्या होत्या. पण, शरद पवार यांनी मात्र भर पावसातच सभा घेत विरोधकांना खुलं आव्हान दिल्याचं पाहायला मिळालं होतं. 


सातारा लोकसभा मतदार संघात श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारसभेसाठी पवारांनी उपस्थिती लावली होती. कोणतीही पर्वा न करता मुसळधार पावसात भाषण केलं आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली. 
साताऱ्यातील या सभेमध्ये पवारांनी उदयनराजे भोसले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली होती. 'निवडणुकीत विरोधकच नाही, असे (तत्कालीन) मुख्यमंत्री म्हणतात. मात्र, आम्हाला दुसऱ्या बाजूला तोडीचे पैलवानच दिसत नाही. आमच्या नेत्यांनी आजवर अनेक पैलवान तयार केले. भाजपला पैलवान आणि कुस्ती हे शब्द शोधत नाहीत', असं शरद पवार म्हणाले होते. 



सोशल मीडियापासून राजकीय पटलापर्यंत आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांच्या या सभेचे पडसाद उमटले होते. त्यानंतर पुढं काय झालं, हे सर्वजण जाणतातच.