नागपुरात मांजाने गळा कापल्याने तरुणाचा मृत्यू
नायलॉनच्या मांजाने (nylon cat) गळा कापल्याने एका 20 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू (Death of youth) झाला.
नागपूर : नायलॉनच्या मांजाने (nylon cat) गळा कापल्याने एका 20 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू (Death of youth) झाला. रामबाग परिसरात संध्याकाळी ही घटना घडली. हा तरुण दुचाकीवरुन जात असताना रस्त्यावर लटकणारा मांजा त्यांच्या गळ्याभोवती अडकला. काही कळायच्या आत तरुणाचा गळा कापला गेला आणि यातच उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला. याधीही नाशकात एका महिलेचा मांजा कापल्याने मृत्यू झाला होता. तर एका व्यक्तीच्या गळ्याला 7 टाके पडले होते.
डिसेंबर महिन्यात नाशिकमध्ये नायलॉन दोऱ्यामुळे महिलेचा मृत्यू झाला होता. दुचाकीवरून घरी जात असताना नायलॉनमांजामुळे गळ्याला गंभीर दुखापत होऊन महिलेचा गाडीवरून पडून मृत्यू होता. सातपूर येथून कामावरून दुचाकीवर घरी जात असताना नाशिकच्या द्वारका पुलावर ही घटना घडली होती. या प्रकरणी नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेनंतर न्यायालयाने फटकारले होते. नायलॉन मांजाला बंदी असतांना सऱ्हासपणे मांजाचा वापर सुरु आहे. याआधी पिंपरीत मांजामुळे डॉक्टर तरुणीचा गाडीवरुन जात असताना मृत्यू झाला होता.
चिनी मायलॉन मांजा बाळगणारांवर आणि विकणाऱ्यांवर औरंगाबाद पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आठ गुन्हे दाखल केल्याचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याआधी सादर करण्यात आला आहे. खंडपीठाने याबाबत सुमोटो याचिका दाखल केली होती आणि असला मांजा विकणाऱ्यांवर कारवाई आदेश दिले होते.