एक झोका, चुके काळजाचा ठोका! झोक्यामुळे 18 वर्षीच्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू
घरातच असलेला नायलॉनच्या दोरीच्या झुला खेळत असताना झुल्याची दूरी गळ्यात अडकून गळफास लागल्याने 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी जळगावातील महाबळ परिसरात घडली आहे.
वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : झोक्यामुळे 18 वर्षीच्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घरातच झोका खेळताना गळफास लागल्याने एकुलत्या एक मुलीचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार(shocking news) जळगाव(Jalgaon) शहरातील महाबळ परिसरात घडला आहे. फक्त लहान मुलांनाच नव्हे तर मोठ्या व्यक्तींना देखील झोक्यावर झुलण्याचा मोह अनावर होतो. मात्र, जळगावात झोक्याची दोरी गळ्यात अडकली अन् तरुणीच्या आयुष्याची दोरी तुटली.
घरातच असलेला नायलॉनच्या दोरीच्या झुला खेळत असताना झुल्याची दूरी गळ्यात अडकून गळफास लागल्याने 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी जळगावातील महाबळ परिसरात घडली आहे. विधी स्वप्निल पाटील असे मृत तरूणीचे नाव आहे. एकुलता एक मुलीच्या मृत्यूने तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
विधी पाटील ही तरूणी आपल्या आई तेजस्वीनी, वडील स्वप्निल पाटील आणि आजोबा यांच्यासह वास्तव्याला होती. ती एका महाविद्यालयात बारावीचे शिक्षण करीत होती. तिचे आई वडील यांचे जळगाव शहरात कॉम्प्यूटर क्लासेसचा व्यवसाय आहे. मंगळवारी 29 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता महाबळ येथील त्यांच्या राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर नायलॉन दोरीच्या झुल्यावर ती बसलेली होती. त्यावेळी घरात कुणीच नव्हते, झुल्याचा झोका घेत असतांना अचानक नॉयलॉन दोरीचा विधीच्या गळ्याला फास लागला. मात्र घरात कुणीही नसल्याचे तिचा गळफास लागल्याने मृत्यू झाला.
तिच्या आजोबांनी तिच्या मोबाईलवर कॉल केला. परंतू ती कॉल उचलत नसल्याचे पाहून ते घरी आले. वरच्या मजल्यावर विधीला झुल्याचा गळफास लागल्याचे निदर्शनास आल्याने आजोबांना धक्काच बसला. या घटनेची माहिती मिळताच रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. तरुणीचा मृतदेह ताब्यात घेवून तो जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला.
विधी ही एकुलती एक मुलगी होती. तिचा नुकताच वाढदिवस साजरा झाला होता. हा वाढदिवस तिचा शेवटचा ठरला. विधी हॉलीबॉल तसेच फुटबॉलची महाविद्यालयीन स्तरावरची खेळाडू होती.