धुळे : आधार कार्डमुळे धुळे जिल्ह्यातील शिरपूर इथे असलेल्या अनाथ गतिमंद बालगृहातील चेतन सेन याला आपल्या आई वडिलांची छत्रछाया पुन्हा मिळाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेतन हा डिसेंबर २०१३ मध्ये राजस्थान राज्यातील राजसमंद जिल्ह्यातील सोलादा गावातून बेपत्ता झाला होता. तो महाराष्ट्रातील भिवंडीत सापडला, तिथून त्याला शिरपूर येथील मराठे विधायक संस्थेत दाखल करण्यात आलं. 


जेव्हा संस्थेने चेतनेचे आधार कार्ड काढण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्याचे आधारकार्ड राजस्थानमध्ये आधीच काढले असल्याचं समोर आलं. 


संस्थेने मग त्या आधारकार्डच्या जोरावर चेतनच्या आई वडिलांना शोधलं आणि त्यांच्याशी संपर्क साधून चेतनला त्यांच्या ताब्यात दिल. संस्थेने गेल्या काही वर्षात पाच मुलांना अशाच पद्धतीने आधार कार्डच्या मदतीने आपल्या परिवाराकडे सुपूर्त केले आहे.