पुणे : युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी आज पुण्यात शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला. टॉप स्कोअरर हा शिवसेनेनं उपक्रम सुरू केलाय. त्या कार्यक्रमाचा निमित्ताने आदित्य पुण्यात आले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

‘शिवसेना टॉप स्कोरर’ या संकेतस्थळाच्या लोकार्पण सोहळ्याचे कार्यक्रमात आदित्य ठाकरे बोलत होते. शिवसेना आणि युवासेना लोणावळा शहरतर्फे आयोजित कार्यक्रमात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी उपस्थित लोणावळा आणि आजूबाजूच्या परिसरातील शाळांमधील विद्यार्थ्यांशी त्यांनी थेट संवाद साधला.


विद्यार्थ्यांना टॅबचंही वाटप 


अभ्यास कसा करायचा याचं मार्गदर्शन आदित्य यांनी विद्यार्थ्यांना केलं. त्याचप्रमाणे आदित्य यांनी विद्यार्थ्यांना टॅबचंही वाटप केलं. या उपक्रमांच मोदी कौतुक करतात पण राज्य सरकार प्रकल्प अंगिकारत नाही म्हणून सरकारवर टीकाही केली. 


दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी प्रयत्न


शिवसेना आणि युवासेना विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मुंबई महापालिका शाळांबरोबरच संपूर्ण राज्यात हा प्रयोग राबविला जाणार आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून आपण घरी बसूनही अभ्यास करू शकतो, असे आदित्य म्हणालेत.