Aaditya Thackeray On Ashish Shelar : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपान दौऱ्यावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात (Maharastra Politics) मोठा राडा झाल्याचं दिसून आलंय. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी जनतेच्या पैशावर मंत्री परदेशात सहल करतात, अशी टीका केली होती. त्यावर भाजपकडून उत्तर देण्यात आलं.  देवेंद्र फडणवीस यांच्या जपानच्या दौर्‍याचा संपूर्ण खर्च हा जपान सरकारने केला, अशी माहिती भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी दिली होती. त्यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर शेलक्या शब्दात टीका देखील केली होती. त्यावरून आता राज्याच्या राजकीय वर्तुळात खडाजंगी पहायला मिळत आहे. त्यावर आता आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलंय.


काय म्हणाले आदित्य ठाकरे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कितीही प्रयत्न करा, माझ्या नावात तुम्हाला ‘बाळ’ हा शब्द लावावाच लागला. ते माझ्या रक्तातच आहे आणि म्हणूनच जनतेचे आशीर्वाद माझ्या सोबत आहेत. अभिमान आहे. एका ‘आदू बाळा’ साठी तुमचा एवढा राग आणि तुमची ही भाषाच तुमच्या मनात बसलेली भीती आणि तुमच्या घरातले संस्कार या बद्दल फार काही बोलून जाते, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray On Ashish Shelar) जोरदार प्रत्युत्तर दिलंय.



शेलार काय म्हणाले होते?


बाप आजारी असताना सरकारी पैशावर लंडनमध्ये मजा मारणार्‍याने दुसर्‍यांना शहाणपण शिकवायचे नसते. आदु बाळा, बालबुद्धीपणामुळे असं होतं, हे मान्य आहे. पण, त्याचा कळस गाठू नका.  देवेंद्र फडणवीस यांनी काय केले आणि किती गुंतवणूक आली, याची संपूर्ण टाईमलाईन त्यांच्या समाजमाध्यमावर उपलब्ध आहे, असं आशिष शेलार म्हणाले होते.


आणखी वाचा - राज आणि उद्धव ठाकरेंना मुंबईच्या डबेवाल्यांची साद, म्हणतात 'वाघांनो एकत्र या, निवडणुकीत...'


संभाजीनगर येथे बोलत असताना आदित्य ठाकरे यांनी शेलारांवर शेलक्या शब्दात टीका केली होती. आदू बाळानं सरकारला सळो की पळो केलं आहे. देशात पप्पूनं सरकारला हलवून सोडलंय. मला अभिमान आहे. कारण, माझ्या आजोबांचं नावही बाळ होतं. ते माझ्या रक्तात आहे, आता मला ते नाव तुम्ही देताय, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी खडेबोल सुनावले होते. त्यानंतर आता आशिष शेलार अन् आदित्य ठाकरे यांच्यात खडाजंगी पहायला मिळत आहे.


दरम्यान,  आदित्य ठाकरे यांनी संभाजीनगर सिद्धार्थ प्राणी संग्रहालयातमध्ये आज फेरफटका मारला आणि त्याचं कारण  म्हणजे वाघांच्या नावावरून झालेलं राजकारण,  मराठवाडा मुक्ती संग्राम दिवशी वाघांचं चिठ्ठ्या काढून बारसं करण्यात आलं होतं त्यावेळेस आदित्य नावाची चिठ्ठी एका वाघाच्या बछड्यासाठी निघाली होती. मात्र ते नाव उपस्थित मंत्री सुधीर मुनगंटीवार , सांदीपान भुमरे आणि खुद्द मुख्यमंत्री यांनी बदललं होतं त्यानंतर बरीच टीकाही झाली होती. त्याच बछड्याला भेट देण्यासाठी आदित्य आले होते.