आकडा मुक्ती झाली पण वीज जोडणी आधीच आलं बिल
महावितरणच्या अनागोंदी कारभाराचा फटका नागरिकांना बसत आहे. परभणी जिल्ह्यातील नरसापूरचे २० कुटुंबीय गेल्या २१ महिन्यापासून अंधारात रात्र काढीत आहेत.
परभणी : महावितरणच्या अनागोंदी कारभाराचा फटका नागरिकांना बसत आहे. परभणी जिल्ह्यातील नरसापूरचे २० कुटुंबीय गेल्या २१ महिन्यापासून अंधारात रात्र काढीत आहेत.
ग्रामस्थांच्या पुढाकारातून महावितरणच्या वतीने नरसापूरमध्ये आकडा मुक्तीचा कॅम्प घेण्यात आला होता. ग्राहकांना मीटर बसवून त्यांना वीज जोडणी दिली नसल्याने अनेक संसार अंधारात आपल्या रात्र काढीत आहेत.
तर महावितरणच्या वतीने देण्यात आलेले मीटर ग्राहकांच्या घरात अडगळीत पडून असतांना महावितरणने मात्र या ग्राहकांना तब्बल सहा सहा हजाराचे बिल पाठवली आहेत.
गावातील सर्व आकडे ग्रामस्थांनी काढून टाकले. ज्याच्याकडे मीटर नाही अशा ७३ लोकांनी कोटेशन भरली त्यातील ५३ लोकांनाच महावितरणकडून मीटर मिळालेत.
वीस मीटर अजून येणे बाकी आहेत. तर मिळालेल्या या ५३ मीटरपैकी २० मीटर २१ महिन्या नंतर ही लाईनमेनने वीज जोडणी न दिल्याने सज्जावर धूळखात पडली आहेत.
पण ज्या वीज ग्राहकांना अद्याप वीज जोडणीच दिली नाही, अशा वीज ग्राहकांना महावितरणने हजारो रुपयांचे बिल पाठवली आहेत.