मुंबई : गोंदियाचे निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. काल भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीवेळी मतदानाच्या ईव्हीएममध्ये आणि व्हीव्हीपॅट मशीनमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे बराच काळ मतदान थांबवण्यात आलं होतं. निवडणुकीतल्या या घोळानंतर अभिमन्यू काळे यांची बदली करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मतदान यंत्रात बिघाड झाल्याने भंडारा गोंदियामध्ये होत असलेल्या पोटनिवडणुकीत ३५ मतदान केंद्रावरचं मतदान रद्द करण्यात आलं होतं. सकाळपासून ६० ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाला आहे. त्यापैकी अनेक ठिकाणी तंत्रज्ञांना बोलावून बिघाड दूर करण्यात आले. पण ३५ ठिकाणी बिघाड दूर होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे इथली मतदान प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. 


दरम्यान, ३५ ठिकाणी पुन्हा मतदान कधी होणार याबाबत कुठलीही माहिती पुढे आलेली नाही. २०१४मध्ये भाजपच्या तिकीटावर निवडून आलेल्या नाना पटोलेंनी मोदी सरकारच्या धोरणांवर टीका करुन खासदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे ही जागा रिक्त होती. आज सकाळी सात वाजता मतदान सुरू झालं. राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे आणि भाजपचे हेमंत पटले यांच्यात जागेसाठी चुरस आहे