`राज्यातली कायद्याची स्थिती बिघडली असं म्हणणं..`; घोसाळकरांच्या हत्येनंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Abhishek Ghosalkar Firing News: शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या मॉरीसनेही नंतर आत्महत्या केली, या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
Abhishek Ghosalkar Firing News: शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. घोसाळकर यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.
Abhishek Ghosalkar News: शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. घोसाळकर यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. तर, विरोधकांनी या प्रकरणात सरकारवर निशाणा साधला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांकडून होत आहे. या सर्व प्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच, या घटनेला राजकीय रंग देणे चुकीचे आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, 'नेत्याचे अशापद्धतीने निधन व्हावे हे अतिशय गंभीर आहे. या प्रकरणाला काही लोक राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करतायेत. हे योग्य नाही. ही घटना जरी गंभीर असली तरी ज्याने गोळ्या घातल्या तो मॉरीस आणि घोसाळकर यांचे एकत्र पोस्टर आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. वर्षानूवर्ष ते एकत्र काम करत होते. त्यांच्यात असा काय बेबनाव झाला की घोसाळकरांवर त्याने थेट गोळ्या चालवल्या आणि स्वतःलाही गोळ्या घातल्या. हा एक महत्त्वाचा विषय आहे. त्याची चौकशी सुरू आहे.'
'बऱ्याच गोष्टी पोलिसांच्याही लक्षात आल्या आहेत. त्या योग्य वेळी आपल्यासमोर उघड करण्यात येतील. त्याची जी काही कारण लक्षात येताहेत ती वेगवेगळी आहेत. त्याची माहितीदेखील देण्यात येईल ही घटना गंभीर आहे. माझी अपेक्षा एवढीच आहे, अशा घटनेत राजकारण करणे योग्य नाही. या घटनेमुळं कायदा व सुव्यस्था संपलेली आहे. अशाप्रकारची विधाने करणे चुकीचं आहे. वैयक्तिक वैमन्यसातून घटना घडलेली आहे.
या घटनेत बंदूक कुठून आली? परवाना होता का? यापुढे बंदुकीचा परवाना दिला पाहिजे का, याचा विचार राज्य सरकार गांभीर्याने करेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, अभिषेक घोसाळकर हे ठाकरे गटाचे माजी नगरसेवक होते. फेसबुक लाइव्हवर घोसाळकर यांची लाइव्ह मुलाखत घेत असतानाच मॉरीस नावाच्या व्यक्तीने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. घोसाळकर यांच्या गोळ्या झाडल्यानंतर मॉरीनने देखील आत्महत्या केली आहे. मॉरीनसे घोसाळकर यांच्यावर 5 गोळ्या झाडल्याचे सांगण्यात येतंय. उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला.