नाशिक : नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांचं मिळून असलेल्या 'सुपर स्पेशालिटी' हॉस्पिटलमधल्या म्हणजेच नाशिकच्या संदर्भ रुग्णालयातील 'आयसीयू'मधील स्थिती अत्यंत गंभीर बनलीय. मागील पंधरा दिवसांपासून या रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील वातानुकूलित व्यवस्था बंद पडली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उपचारासाठी दाखल असलेले रुग्ण एकतर स्वखर्चाने पंखे आणत आहेत तर काही आहे त्या अवस्थेत उपचार घेत आहेत. याशिवाय हॉस्पिटलची लिफ्ट बंद आहे. त्यामुळे एमर्जन्सीमध्ये दाखल झालेल्या रुग्णाला नातेवाईक आणि कर्मचारी झोळी करुन संबंधित वॉर्डमध्ये घेऊन जात आहेत. 


विशेष म्हणजे, आयसीयूमधल्या उपकरणांसाठी ठराविक तापमानाची गरज असते पण ती इथं उपलब्ध होत नसल्याने अनेकांना त्रासाला सामोरं जावं लागतंय.


जिल्ह्यातील नागरिकांना उपचारांसाठी मुंबई, पुण्याला जाण्याऐवजी नाशिकमध्येच सुपर स्पेशालिटी रुग्णालय उपलब्ध करून देण्यात आले होते. मात्र, आता सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचीच ही अवस्था असेल तर रुग्णांनी कुठे जायचं? हा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय.