पंढरपूरमध्ये महावितरणच्या तिघांना लाच घेताना रंगेहाथ अटक
पंढरपूर आणि नांदेडमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं केलेल्या धडक कारवाईत चौघांना अटक करण्यात आलीये.
नांदेड : पंढरपूर आणि नांदेडमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं केलेल्या धडक कारवाईत चौघांना अटक करण्यात आलीये. पंढरपूरमध्ये महावितरणच्या तिघांना लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली.
सोलापूर एसीबीनं ही कारवाई केला. वीज मीटर बदलण्यासाठी सहाय्यक अभियंता जयप्रकाश कदमनं लाच मागितली होती. महावितरणचा उपकार्यकारी अभियंता संतोष सोनावणे आणि ऑपरेटर चंद्रशेखर जाधव यांनाही वेगळ्या घटनांमध्ये अटक करण्यात आलीये.
कर्मचाऱ्याचं निलंबन रद्द करण्यासाठी 15 हजाराची लाच घेताना ही कारवाई झाली. याआधी त्यांनी ४० हजार रुपये घेतले होते. तर नांदेडमध्ये आयपीएस अधिकारी विजयकृष्ण यादव यांच्यासाठी 1 लाखांची लाच स्वीकारणाऱ्या इसमाला एसीबीनं बेड्या ठोकल्यात. अमरावती एसीबीनं ही कारवाई केलीये.
अमरावती जिल्ह्यातील तिवसा पोलीस स्थानकात कार्यरत असताना रेतीची कारवाई थांबवण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. नांदेडच्या इतवारा पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आलाय.