पुणे-सातारा रोडवर एसटी-ट्रक आणि मारुतीचा अपघात
पुणे सातारा रोडवर शिंदेवाडी जवळ अपघात झाला आहे. एसटी बस, ट्रक आणि मारुती कारमध्ये हा अपघात झाला.
पुणे : पुणे सातारा रोडवर शिंदेवाडी जवळ अपघात झाला आहे. एसटी बस, ट्रक आणि मारुती कारमध्ये हा अपघात झाला. या अपघातात पाच ते सहा जण जखमी झाल्याचा अंदाज आहे. ट्रक आणि एसटी बस यांच्यात धडक झाल्यानंतर, ही दोन्ही अवजड वाहनं जवळच असलेल्या खड्ड्यात पडली.