Mahashivratri 2023 : महाप्रसाद घेण्यासाठी थांबलेल्या नागरिकांसोबत घडला धक्कादायक प्रकार; महाशिवरात्रीच्या उत्सवात गोंधळ
Mahashivratri 2023 - महादेवाच्या महाप्रसादाचा लाभ घेण्याआधीच भाविकांसह घडला धक्कादायक प्रकार.
प्रविण तांडेकर, झी मीडिया, नांदेड : देशासह राज्यभरात महाशिवरात्रीचा (Mahashivratri 2023) उत्साह पहायला मिळत आहे. महाशिवरात्री निमित्ताने अनेक ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेडमध्ये महाप्रसाद घेण्यासाठी थांबलेल्या नागरिकांसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. महाप्रसाद घेण्यासाठी थांबलेल्या नागरिकांना अनियंत्रित करणे दिली धडक दिली. या घटनेत सात भाविक जखमी झाले आहेत. या विचित्र अपघातामुळे महाशिवरात्रीच्या उत्सवात गोंधळ उडाला (Accident during Mahashivratri celebrations in Nanded).
भंडारा तुमसर महामार्गावर मोहाडी येथे ही घटना घडली. अनियंत्रित कारणे धडक दिल्याने हा विचित्र अपघात घडला. महाशिवत्री निमित्ताने जागोजागी महाप्रसाद वाटप सुरू आहे. मोहाडी शहारातील महादेव मंदिरात सुध्दा महाप्रसाद वाटप सुरु होते. नागरिक मोठया संख्येने महाप्रसाद घेण्यासाठी आले होते. त्याच वेळी भंडारा कडून तुमसरच्या दिशेने जाणाऱ्या वॅगनार कारने या भविकांना धडक दिली.
ही कार अनियंत्रित झालेल्या रस्त्यालगत महाप्रसाद घेत असलेल्या नागरिकांना जोरदार धडक दिली. त्यामध्ये सात जण जखमी झाले असून त्यांच्यावर मोहाडी ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील दोन गंभीर जखमी आहेत. त्यांची प्रकृति चिंताजनक असल्याचे समजते.
अपघातानंचर वॅगनार मधील चालकाला पकडून स्थानिकांनी चांगला चोप दिला आहे. यानंतर नागरिकांनी या कारचालकाला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. कारचे ब्रेक फेल होऊन कार अनियंत्रित झाल्याने अपघात झाल्याचे बोलले जात आहे.