मुंबई-गोवा महामार्गावर अपघातात १ ठार, १७ जखमी
मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूर तालुक्यातल्या लोहारमळा इथे पहाटे झालेल्या अपघातात १ ठार तर १७ जण जखमी झाले.
पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूर तालुक्यातल्या लोहारमळा इथे पहाटे झालेल्या अपघातात १ ठार तर १७ जण जखमी झाले.
आत्माराम ट्रॅव्हल्सची खासगी बस मुंबईहून कोकणात जात असताना चालकाचं बसवरच नियंत्रण सुटलं आणि रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन आदळली. स्थानिकांच्या मदतीनं पोलिसांनी जखमींना गाडीतून बाहेर काढले.
जखमींवर पोलादपूरच्या ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येतायत. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे.