लोणावळा : पावसामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर अपघात झाला आहे. या अपघातात तीन ते चार गाड्या एक-मेकांना धडकल्या आहेत.


पावसामुळे अपघात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओखी चक्रीवादळाचा परिणाम कोकण किनारपट्‍टीवर जाणवत आहे. त्यासोबतच राज्यातील इतर परिसरातही वातावरणात बदल झाल्याचं पहायला मिळालं.


पुण्यातही पावसाने हजेरी लावली


मुंबई, ठाण्यासह रायगड परिसरातील काही भागात सोमवारी सायंकाळी पाऊस पडला. पुण्यातही पावसाने हजेरी लावली. पुण्यात पडलेल्या पावसामुळे एक्सप्रेस-वेवर अपघात झाला आहे. 


काही प्रावसी किरकोळ जखमी


पावसामुळे रस्ता निसरडा झाल्याने कामशेत बोगद्यात ३-४ गाड्या एकमेकांवर आदळल्या आहेत. या अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला आहे.