रत्नागिरी : रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर आंब्यांनजीक झालेल्‍या भीषण अपघातात दोन लहान मुलांसह ५ जण ठार झाले आहेत तर, २ जण गंभीर जखमी झाले आहेत. गणपतीपुळ्याला जात असताना आंबा-तळवडे जवळ कार झाडावर आदळल्‍याने हा अपघात झाला. 


देवदर्शनाला जाताना अपघात


जखमींना उपचारासाठी रूग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे. गणपतीपुळ्याला जात असताना आंबा-तळवडे जवळ कार झाडावर आदळल्‍याने हा अपघात झाला. 


जखमींची स्थिती गंभीर


२ चिमुकल्यासह ४ गंभीर जखमी झाले आहेत. सकाळी १० वाजता हा अपघात झाल. भरधाव कार चालकांचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याकडेच्या झाडावर जाऊन आदळल्याने हा भीषण अपघात झाला. चालक प्रशांत पाटणकर हा गंभीर आहे. जखमींची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. दोन्ही चिमुकल्या बाळांना डोक्याला इजा झाली आहे. सलग सुट्टीमुळे हे कुटुंब कोकणात निघाले असल्याची माहिती घटनास्थळी मिळाली.