मुंबई : कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर राज्याच्या अर्थकारणाला पुन्हा एकदा मोठा फटका बसला. लॉकडाऊनमुळे छोटे-मोठे व्यावसायिक पुरते हतबल झालेत. त्यांच्याकडून उद्योग-व्यापारीवरील निर्बंध हटवण्याची मागणी जोर धरतीय. तर दुसरीकडे या मंदीतही अंमली पदार्थांचा धंदा मात्र तेजीत आलाय. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) आकडेवारीनुसार गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा ड्रग्स संबंधित प्रकरणांचं प्रमाण तिप्पट आहे. (According to Narcotics Control Bureau number of drug related cases has tripled this year compared to 2020)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


2020 मध्ये अंमली पदार्थांच्या 46 केसेस नोंदवल्या गेल्या होत्या. तर यंदाच्या वर्षात गेल्या 5 महिन्यात 55 केसेस नोंदवल्या गेल्या आहेत. तसेच 106 लोकांना अटकही करण्यात आली आहे. तर 4 मोठ्या टोळ्यांचा पर्दाफाश झाला आहे. 2020 मध्ये जवळपास 29 किलो गांजा जप्त करण्यात आला होता. तर 2021 मधील पहिल्या 5 महिन्यात म्हणजेच मे पर्यंत 222 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. या आकड्यांवरुन गुन्हेगारी विश्वात अंमली पदार्थांच्या खरेदी-विक्रीचा वेग किती वाढलाय हे स्पष्ट होतंय.


संबंधित बातम्या : 


जाहिरातबाजी करणाऱ्या लोकप्रतिनिधींना मुंबई महापालिकेच्या आयुक्तांकडून तंबी