रायगड : अलिबागमधील २०२ अनधिकृत बंगल्यावर कारवाई होणार असून हे सर्व बंगले जमीनदोस्त करण्यात येणार असल्याची माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिलीय. यात बॉलिवूड सेलिब्रिटी आणि बड्या हस्तींचे बगले आहेत. मात्र  हे बंगले अनधिकृत असल्यानं त्यांच्यावरही हातोडा चालवण्यात येणार आहे. यात बँकांना हजारो कोटींचा गंडा घालणाऱ्या नीरव मोदीचाही बंगला आहे. मंत्रिमंडळात हा निर्णय घेण्यात आला असून लवकरात लवकर कारवाई करणार असल्याचं कदम यांनी सांगितलंय.