बोगस स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांवर कारवाई
बीड जिल्ह्यात बोगस स्वातंत्र्य सैनिकांच्या १०६ वारसांवर बडतर्फीच्या कारवाईचे आदेश सरकारनं दिले आहेत.
बीड : बीड जिल्ह्यात बोगस स्वातंत्र्य सैनिकांच्या १०६ वारसांवर बडतर्फीच्या कारवाईचे आदेश सरकारनं दिले आहेत.
पालकांच्या बोगस स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रमाणपत्राच्या आधारावर सरकारी नोकरी मिळवणाऱ्यांना बडतर्फ करण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत.
बीड जिल्ह्यात ३५५ बोगस स्वातंत्र्य सैनिक असल्याच्या प्रकरणाची उच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यातल्या २९८ जणांवर कारवाईचे आदेश न्यायालयानं दिले होते. त्यापैंकी सरकारी नोकरीत असलेल्या १०६ लोकांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.
या १०६ लोकांवर कारवाई करून त्यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याचे आदेशही सरकारनं दिलेत.