नाशिक :  नाशिक महानगरपालिका प्रशासनाने पाणीपट्टी थकबाकीदारांवर कारवाईला सुरवात केली आहे. यासाठी नाशिक महानगर पालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याचं कारण पुढे केले जात आहे. 


६५ हजार थकबाकीदार 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या पंधरा दिवसात १५० ग्राहकांचे नळ कनेक्शन तोडण्यात आले असून २५ हजार ग्राहकांकडून साडेसात कोटी रुपयांची वसुली करणायत आलीय.  एकूण ६५ हजार थकबाकीदार आहेत. 


३५ कोटींचा महसूल,२४ कोटींचा कर


जकात आणि एलबीटी बंद झाल्याने महापालिकेचे उत्पन्नाचे स्त्रोत घटलेत. त्यामुळे मनपा प्रशासनाने उत्पन्न  वाढीकडे लक्ष केंद्रित केलंय.  शहरात एकूण २ लाख नळजोडणी आहेत. त्यातून महापालिकेला सुमारे ३५ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होतो. मागील वर्षी २४ कोटी रुपयाचा कर वसूल झाला होता.


४१ टक्के पाणी गळती 


 मनपा प्रशासन एकीकडे नागरिकांकडून कराची वसुली करत असताना वितरण व्यवस्थेत होणार्या गळतीकडे दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. तब्बल ४१ टक्के पाणी गळती होत असलायचे मन्याच्या सर्वेक्षणात उघडकीस आलाय.