ठाणे : मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांच्या विरोधात ठाणे वाहतूक पोलिसांनी २५ डिसेंबरपासून कारवाई सुरू केली आहे. पहिल्या चार दिवसांत विविध ठिकाणी केलेल्या नाकाबंदीमध्ये सुमारे ४१५ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई आणखी तीव्र केली जाणार आहे. त्यासाठी ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगरसह ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ठिकठिकाणी चेकपोस्ट उभारून प्रत्येक वाहनचालकाची तपासणी केली जाणार आहे. 


मोटार वाहन कायद्यान्वये केवळ मद्यपी वाहनचालकच नव्हे तर, वाहनांतील सहप्रवासीसुद्धा दोषी ठरतात. यंदा त्यांच्या विरोधातही कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे कुणीही मद्य प्राशन करून वाहन चालवू नये, असे आवाहन वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.