Dhule NCP : महाविकास आघाडी सरकार (MVA) पडल्यानंतर आता राष्ट्रवादीचा (NCP) अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. धुळ्यातील (Dhule NCP) असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. धुळ्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यासमोर कार्यकर्त्यांची गटबाजी उफाळल्याचं दिसून आलं आहे. राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे (Anil Gote) यांचा बॅनरवर फोटो न लावल्यावरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनिल गोटे यांचा बॅनरवर फोटो न लावल्याने राष्ट्रवादीतील अनिल गोटे समर्थक कार्यकर्ते नाराज झाले होते. त्यानंतर या कार्यकर्त्यांनी राडा घातला. त्यावेळी राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते एकमेकांसमोर आले होते. जयंत पाटील यांच्यासमोर कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी केल्याने सध्या हा चर्चेचा विषय बनला आहे.


आणखी वाचा - Andheri Bypoll: 'रमेश लटके आज असते तर...', Narayan Rane यांचं मोठं वक्तव्य!


भाजपच्या दलालांचा धिक्कार असो, असं म्हणत जयंत पाटील यांच्यासमोर अनिल गोटे समर्थकांची घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीमुळे कार्यक्रमात काही काळ तणावाचं वातावरण होतं. अनिल गोटे समर्थकांच्या घोषणाबाजीमुळे आता धुळ्यातील हा राजकीय वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.



दरम्यान, काही दिवसांपूर्वी शरद पवारांच्या (Sharad Pawar) दौऱ्याआधी देखील अनिल गोटे यांच्या समर्थकांनी राडा घातला होता. शरद पवार धुळे दौरा असतानाच त्यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवरून पुन्हा दोन गटातील वाद चव्हाट्यावर आला होता. त्यानंतर आता पुन्हा राष्ट्रवादीमध्येच नव्या वादाला तोंड फुटलंय.