सध्या महाराष्ट्राच राजकारण वेगळ्याच दिशेला जात आहे. कुडघोरी, एकमेकांचे पाय खेचणे, टिका असं सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाच चित्र पाहायला मिळतं. या सगळ्यात राजकारणाचं भविष्य काय? किंवा भावी पिढी राजकारणाकडे कशी बघेल? असा प्रश्न पडलेला असतानाच सोशल मीडियावर राजकारणाची एक क्युट अशी बाजू पाहायला मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या शिवसेना आमदार आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक लहान चिमुकला आपल्या बोबड्या बोलांनी 'जय महाराष्ट्र' अशी घोषणा देत आहे. हा व्हिडीओ नेमका कुठचा आहे हे अद्याप कळलेलं नाही पण शिवसेनेच्या इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. 


आदित्य ठाकरे आणि तो चिमुकला 



आदित्य ठाकरे एका कार्यकर्त्याच्या घरी गेल्याचं दिसत आहे. यावेळी एक चिमुकला सफेद शर्ट आणि जिन्समध्ये अशा पेहराव्यात शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांचं स्वागत करतो. या वेळी तो आपल्या बोबड्या बोलांनी हात उंचावून 'जय' महाराष्ट्र म्हणतोय. यावेळी आदित्य ठाकरे देखील त्याला प्रतिउत्तर देत्तर देत ' अरे व्हा, जय महाराष्ट्र ' असं म्हटलं आहे. तसेच पुढे दोघंही एकमेकांना हायफाय करताना दिसत आहेत. या पोस्टखाली 'छोटा शिवसैनिक' "राजकारणातील भावी पिढी' अशी प्रतिक्रिया देखील पाहायला मिळत आहे. 


वसंत मोरेंचा चिमुरड्यासोबतचा व्हिडीओ


गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ व्हायरल होतोय तो म्हणजे मनसे नेते वसंत मोरे यांचा. मनसे नेते वसंत मोरे यांच्यासारखी वेशभूषा एका लहान मुलाने नवरात्रीमध्ये दांडियाच्या फॅन्सी ड्रेसमध्ये केली होती. वसंत मोरे यांनी त्या मुलाचे भेट घेऊन त्याच्यासोबतच फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. 


वसंत मोरे यांची पोस्ट 



ओळखलं का याला हा आहे मुंबई वडाळा मधील मनसे शाखा अध्यक्ष संजय रणदिवे यांचा नातू वीर पृथ्वीराज रणदिवे,
हा वडाळाच्या झोपडपट्टीत राहतो,
याच्या वडिलांनी याला नवरात्रीमध्ये दांडियाच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये माझी वेशभूषा केली अतिशय छोटा मुलगा आहे...
मी मागच्या आठवड्यात माननीय राज साहेबांना भेटण्यासाठी मुंबईला गेलो असता माझी गाडी वडाळ्यातून चालली होती मला अचानक याची आठवण झाली आणि मी याच्या आजोबांना फोन लावला ताबडतोब ते मला घेण्यासाठी आले आणि मी घरी जाऊन वीरची भेट घेतली,
खूप गोड मुलगा आहे...
मोठ्यांच्या घरी आपण नेहमीच जात असतो पण मला गरीबाच्या घरी जायला खूप जास्त आवडते...


राज ठाकरेंकडून 10 हजारांच्या खेळण्यांची भेट 


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ऑगस्ट महिन्यात अचानक एका चिमुकल्याची थेट त्याच्या घरी जाऊन भेट घेतली. पिंपरी-चिंडवडमधील दापोडी येथील एका कार्यकर्त्याच्या घरी राज ठाकरे अचानक पोहोचले. विशेष म्हणजे नेहमीप्रमाणे त्यांच्या भोवती कार्यकर्त्यांचा गराडा नव्हता. त्यांनी या चिमुकल्यासाठी तब्बल 10 हजार रुपयांची खेळणी आणि चॉकलेट आणले होते.