मुली दत्तक घेण्यात महाराष्ट्र आघाडीवर
गेल्या काही वर्षांत देशात मुली दत्तक घेण्याऱ्यांची संख्या वाढलीय....
मुंबई : गेल्या काही वर्षांत देशात मुली दत्तक घेण्याऱ्यांची संख्या वाढलीय....यात महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे. नकोशी असलेली मुलगी आपल्या राज्यात हवीहवीशी झालीय. मुलांना दत्तक देणा-या कारा या संस्थेनं ही माहिती दिलीय. गेल्या १० वर्षांपासून मुली दत्तक घेण्याकडे कल वाढलाय. तर गेल्या २ वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या ६ वर्षांमध्ये ६० टक्के मुली दत्तक घेतल्या गेल्या आहेत. गेल्या वर्षभरात देशात ३,२७६ मुलं दत्तक घेतली गेली. त्यापैकी १८५८ मुली आहेत. गेल्या वर्षी महाराष्ट्रात ६४२ मुलं दत्तक देण्यात आली त्यापैकी ३५३ मुली आहेत. महाराष्ट्रामध्ये मुलं दत्तक देणाऱ्या ६० संस्था आहेत.