Ganpati Dance: सध्या राज्यभरात गणेशोत्सवाची धुम पहायला मिळत आहे. दीड दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्यात आला. यासह गौरी गणपतीचेही विसर्जन झाले आहे. आता सर्वांना वेध लागले आहेत. अनंत चतुर्थी दिवशी होणाऱ्या विसर्जनाचे. अनेक जण हौसेने गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत मनसोक्त डान्स करतात. गणपती डान्स करणाऱ्यांना रोजगाराची संधी आहे.  विसर्जनात नाचणाऱ्यांना कमाई करता येणार आहे. यासाठीची जाहिरात देखील वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली आहे. 


अजब जाहिरात प्रसिद्ध


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्तमान पत्रात अनेक विषयांवर नोकरीविषयी देखील जाहिराती प्रसिद्ध होत असतात. जिथे नोकरी संदर्भातील जाहिराती असतात त्याच रखान्यात एक विचित्र जाहिरात प्रसिद्ध आहे. या जाहिरातीच्या माध्यमातून गणपती विसर्जन गर्दीत डान्स करणाऱ्यांना संधी दिली जाणार आहे. ही जाहिरात प्रसिद्ध करणाऱ्याचे नाव नमूद करण्यात आलेले नाही. नाही मात्र, ठिकाण भोसरी असे नमूद करण्यात आले आहे. यावरुन भोसरी परिसरात गणपती विसर्जन गर्दीत डान्स करण्यासाठी मुलं मुली पाहिजेत असं स्पष्ट होत आहे. या जाहिरातीत संपर्क साधण्यासाठी मोबाईल नंबर देखील देण्यात आला. ज्यांना जाहिरातीत इंटरेस्ट वाटतो त्यांनी  9373999454 संपर्क करावा.


गणपती विसर्जन गर्दीत डान्स करण्यासाठी मुलं मुली पाहिजेत; काय आहे नेमकं जाहिरातीत?


गणपती विसर्जन गर्दी मध्ये गणपती डान्स करण्यासाठी फक्त एक दिवस दि 27 सप्टेंबर या दिवशी 100 मुले मुली पाहिजेत. वय 18 ते 30, वेळ संध्या 5 ते 10, स्थळ भोसरी,  पे 300 रुपये पर डे. 9373999454 असा मजकूर या जाहिरातीत छपण्यात आला आहे. 


जाहिरात व्हायरल  


गणपती विसर्जन गर्दीत डान्स करण्यासाठी मुलं मुली पाहिजेत अशा आशयाच्या जाहिरातीच्या कात्रणाचा फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेक जण हा फोटो शेअर करत आणि एकमेकांना फॉरवर्ड करत आहे. सर्वच सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर  जाहिरातीच्या कात्रणाचा फोटो फिरत आहे.  जाहिरातीच्या कात्रणाच्या फोटोवर कमेंट्सचा पाऊस देखील पडत आहे. अनेक जण यावर गमीतीशीर कमेंट करत आहेत. चला नाचायला... असं म्हणत @PuneriSpeaks नावाच्या ट्विटर हँडलवरुन हा फोटो शेअर करण्यात आला आहे. 



पुण्यात जाहिरातींचे अजब फॅड


पुण्यात जाहिरातींचे अजब फॅड आहे. काही महिन्यांपूर्वी एका तरुणाने नाराज असलेल्या प्रेयसीचा रुसवा घालवण्यासाठी शहरभर अजब प्रकारचे बॅनर लावले होते. याचे बॅनर देखील चांगलेच व्हायरल झाले होते.