Hasan Mushrif ED Raid: 14 तासाच्या चौकशी नंतर ईडीचे पथक हसन मुश्रीफ यांच्या घरातून बाहेर पडले; हाती काय पुरावे लागले?
Hasan Mushrif ED Raid : आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागल आणि पुणे येथील घरांवर ईडीच्या (ED Raids) अधिकाऱ्यांनी धाड टाकली आहे. तब्बल 14 तासांनंतर ईडीचे पथक हसन मुश्रीफ यांच्या घरातून बाहेर पडले आहेत.
Maharashtra Political News : कोल्हापूर येथील राष्ट्रवादीचे वजनदार नेते आणि आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) हे ईडीच्या रडावर आहेत. मुश्रीफ यांच्या कागल आणि पुणे येथील घरांवर ईडीच्या (Hasan Mushrif ED Raids) अधिकाऱ्यांनी धाड टाकली आहे. तब्बल 14 तासांनंतर ईडीचे पथक हसन मुश्रीफ यांच्या घरातून बाहेर पडले आहे(Hasan Mushrif ED Raid). चौकशी दरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांच्या हाती काय लागले हे अद्याप समजू शकलेले नाही.
भाजप नेते किरिट सोमय्या (Kirit Somaiyya) यांनी केली होती चौकशीची मागणी
राष्ट्रवादीचे आमदार आणि नेते हसन मुश्रीफांच्या घरी ईडीने धाड टाकली. बुधवारी पहाटेपासून ईडीचं हे धाडसत्र सुरु होते. कागलमधल्या घरी ईडीचे (Hasan Mushrif Kagal Home ED Raid) अधिकारी दाखल झाले. भाजप नेते किरिट सोमय्या यांनी याआधीच घोटाळ्याचे आरोप करत मुश्रीफांच्या ईडी चौकशीची मागणी केली होती. मुश्रीफांच्या शेल कंपन्या तयार करुन कोट्यवधींची संपत्ती जमवल्याचा पहिला आरोप सोमय्यांनी केला होता. त्यानंतर कागलच्या सर सेनापती साखर कारखान्यातही घोटाळ्याचा आरोप करत सोमय्यांनी ईडीकडे कागदपत्र दिली होती. अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्याशी संबंधित घोटाळ्याचा तिसरा आरोपही सोमय्यांनी केला होता. हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांनी बोगस कंपन्यांद्वारे पैसा वळवल्याचा सोमय्यांचा आरोप होता. दरम्यान या कारखान्यांशी आपला काही संबंध नाही, असा दावा मुश्रीफ यांनी केलाय.
पुण्यातले पार्टनरल चंद्रकांत गायकवाड यांच्या ऑफिसवरही ईडीची धाड
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांचे पुण्यातले पार्टनरल चंद्रकांत गायकवाड यांच्या ऑफिसवरही ईडीने छापे मारलेत. ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या ऑफिसवर हे छापे टाकले आहेत.कोलकात्याच्या कंपन्यांमधून पैसे मुश्रीफांच्या कारखान्यात आणण्यात गायकवाड यांचा हात असल्याचा आरोप आहे.
विरोधी पक्षातल्या प्रमुख नेत्यांवर दबावाचं राजकारण - संजय राऊत
एका विचारधारेविरोधात लढणा-यांवर देशभरात छापे पडत आहेत, अटकसत्र सुरू अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलीय. विरोधी पक्षातल्या प्रमुख नेत्यांवर दबावाचं राजकारण केलं जातंय. मुश्रीफ या संकटातून सुखरूप बाहेर पडतील असं राऊत म्हणाले.
मुश्रीफांच्या घरी ईडीचे छापे पडल्यानं मुश्रीफ समर्थक प्रचंड आक्रमक
मुश्रीफांच्या घरी ईडीचे छापे पडल्यानं मुश्रीफ समर्थक प्रचंड आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. पहाटेपासून आतापर्यंत छापेमारी सुरूच असल्यानं मुश्रीफ समर्थक संतप्त झाले आणि त्यांनी मुश्रीफांच्या घराबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. भाजपविरोधात मुश्रीफ समर्थकांनी घोषणा दिल्या. यावेळी किरीट सोमय्यांचा प्रतिकात्कम पुतळा जाळण्यात आला. चौकशीची तयारी आहे पण ईडीनं अशा प्रकारे कुठलीही माहिती न देता छापे मारणं आणि मुश्रीफांच्या कुटुंबीयांना त्रास देणं चुकीचं असल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.