Maharashtra Politics : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा (Maharashtra-Karnataka Border Dispute) प्रश्न आता चांगलाच पेटला आहे. कन्नड वेदिकेच्या (Kannada Rakshana Vedike) कार्यकर्त्यांनी बेळगावच्या (Belgaum) हिरेबागेवाडी टोलनाक्यावर तुफान दगडफेक केलीय. महाराष्ट्रातून आलेल्या गाड्यांना कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी लक्ष्य केलं. कन्नड वेदिकेचा नारायण गौडा बेळगाव जिल्हा दौऱ्यावर आला आहे. त्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी ही दहशत माजवली. महाराष्ट्रातून (Maharashtra) आलेल्या गाड्यांवर तुफान दगडफेक करत, गाड्यांना काळं फासत तोडफोड करण्यात आली. हिरेबागेवाडी टोलनाक्यावर कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी हा धिंगाणा घातलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्यप्रदेशसोबतही सीमावाद पेटणार
कर्नाटक, गुजरातनंतर आता मध्य प्रदेशसोबतही (Madhya Pradesh) सीमावाद पेटण्याची चिन्ह आहेत. कारण बुलढाणा ( Buldana) जिल्ह्यातल्या 4 गावांनी मध्य प्रदेशात सामील होण्याचा निर्णय घेतलाय. बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील मध्य प्रदेशच्या सीमेवरची ही 4 गावं आहेत. भिंगारा , गोमाल 1 , गोमाल 2 आणि चाळीस टपरी अशी या गावांची नावं आहेत. शिक्षण , आरोग्य , वीज , रस्ते , पिण्याचे पाणी या मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय. त्यामुळे हे गावकरी उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना मध्य प्रदेशात सामील होण्याबाबत निवेदन देणार आहेत. ही सर्व गावं मध्यप्रदेशच्या सीमेवर असून आदिवासी भागातील आहेत.


गुजरात सीमावादावरुन विरोधक आक्रमक
महाराष्ट्राचे तुकडे करण्याचे प्रयत्न करणाऱ्यांचेच तुकडे होतील अशी टीका ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलीय. देशात केवळ निवडणुकांचं राजकारण केलं जात असल्याची टीका राऊतांनी केलीय. गुजरात (Gujrat) सीमेलगत सुरगाणा (Surgana) तालुक्यातली काही गावं गुजरातमध्ये जाण्याची मागणी करत आहेत. सोलापूर अक्कलकोटवर कर्नाटकने दावा सांगितलाय. तर सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातल्या काही गावांना पाण्यासाठी कर्नाटकात जायचंय. या मागण्या केवळ निवडणुकांसाठी असल्याचं राऊत म्हणाले. 


नाशिकच्या पालकमंत्र्यांनी घेतली दखल
आदिवासी भागातील सर्व समस्या तातडीनं दूर करा असे आदेश नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी दिलेत. सुरगाणा तालुक्यातल्या ग्रामस्थांची पालकमंत्र्यांसोबत आज नाशिकमध्ये बैठक झाली. सुरगाणा तालुक्यातील गावांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना दिलेत.