मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यानंतर आता राष्ट्रवादीचे दुसरे नेते नवाब मलिक यांच्याभोवती ईडीने आपला फास आवळला आहे. सलग तास तासांच्या चौकशीनंतर ईडीने नवाब मलिक यांना अटक केलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या अटकेनंतर राष्टवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया दिलीय. मंत्री नवाब मलिक यांना ज्या पद्धतीने अटक झालीय ते पाहता ही सुडाची कारवाई असल्याचं त्यांनी म्हटलंय.


हा लोकशाहीचा मुद्दा पाडण्याचा प्रयत्न आहे. या प्रकारामुळे संविधानाला काहीच किंमत नाही असे वाटतंय. इतके सुडाचे राजकारण या देशाने पाहिले नाही. हा लोकशाहीचा खून आहे, असे आव्हाड म्हणाले.


मलिक यांच्याविरोधात नेमके आताच पुरावे मिळाले. आताच नेमकं सगळं घडावं. हा काय योगायोग नक्कीच नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकार पडण्याचे भाकीत वर्तवलयं. पण, सरकारला काही धोका असल्याचं मला दिसत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.