कैसा लगा....? सत्तास्थापनेच्या राजकीय नाट्यावर मिश्किल प्रतिक्रिया
पायउतार झालेल्या सरकारवर अनेकांकडून ....
मुंबई : Maharashtra महाराष्ट्रातील राजकीय संघर्षामध्ये गेल्या बऱ्याच दिवसांपासून दरदिवशी रंजक वळणं येताना दिसत होती. हातातोंडाशी आलेली सत्ता जाताना काही बडे नेत्यांचे प्रयत्न अपयशी ठरले, काही ठिकाणी बंडखोरी झाली तर कुठे नात्यांचे बंधही जिंकताना दिसले.
सर्वोच्च न्यायालयाने बहुमत चाचणी तातडीने करण्याचे आदेश दिल्यानंतर अवघ्या काही तासांनीच Ajiit Pawar अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. बहुमत सिद्ध करण्यात असमर्थ असल्याचा मुद्दा पुढे करत हे सरकार अवघ्या काही तासांतच राज्याच्या राजकारणातून माघार घेताना दिसलं. तर, इथे महाराष्ट्रविकासआघाडीच्या गोटात मात्र आनंदाची लाट उसळल्याचं पाहायला मिळालं.
सोशल मीडियावर या साऱ्याचे थेट पडसाद उमटताना दिसले. प्रत्येक घडामोडीवर अनेक नेटकऱ्यांनी मिश्किल अंदाजात भाष्य केल्याचं पाहायला मिळालं. कोणी पायउतार झालेल्या सरकारवर उपरोधिक टीकास्त्र सोडलं, तर कोणी महाराष्ट्रात 'चाणक्य' एकच असं म्हणत राजकारण कोळून प्यायलेल्या राष्ट्रवादीचे प्रमुख Sharad Pawar शरद पवार यांची वाहवा केली.
महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेच्या पेचात सर्वत्र तणावाचं आणि गोंधळाचं वातावरण दिसताना मंगळवारी काही दिलासा देणारे क्षणही पाहायला मिळाले. त्याचाच आधार घेत नेटकऱ्यांनी अगदी सेक्रेड गेम्सपासून, काही व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ पोस्ट करत अजित पवार, देवेंद्र फडणवीस, अमित शाह यांना ट्रोल केल्याचं पाहायला मिळालं.