जळगाव : Governor Bhagat Singh Koshyari controversial statement : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Bhagat Singh Koshyari) यांच्या वादग्रस्त विधानानंतर जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) कार्यकर्ते आक्रमक झाले. राज्यपाल आज जळगावच्या (Jalgaon) दौऱ्यावर आहेत. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राज्यपालांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षांसह कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि कार्यकर्ते यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या विषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध राष्ट्रवादीकडून करण्यात येत होता. काल औरंगाबाद येथील एका जाहीर कार्यक्रमांमध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर एक वादग्रस्त विधान केल्याबद्दल त्याचे पडसाद आज जळगाव शहरामध्ये देखील दिसून आले आहेत. 


राज्यपाल कोश्यारी हे जळगावच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असताना आज त्यांचा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये एका कार्यक्रमात जाण्याच्या आधीच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आकाशवाणी चौकात त्यांचा निषेध म्हणून काळे झेंडे दाखवणार दाखवले. यावेळी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. घोषणाबाजी करत असताना पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.