Ajit Pawar :  मिश्किल स्वबाव आणि  रोखठोक स्वभाव अशी विधानसभेचे विरोधी अजित पवार यांची ओखळ. थेट आणि बेधडक बोलणारे अजितदादा तितेच शिस्त प्रिय देखील आहेत. यामुळे त्यांची कार्यशैली देखील तितीच आक्रमक आहे. बारामतीकरांना याचा चांगलाच अनुभव आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांचे निरीक्षण देखील चांगलेच आहे. एखादा त्रुटी दिसून आल्यास लगेच ते दाखवून देतात. पुण्यात एका हॉटेलच्या उद्घाटनावेळी अजि पवार यांनी थेट हॉटेलच्या संचालकाच बाथरुममध्ये असलेली त्रुटी दाखवून दिली. इतकंच नाही तर त्यांनी प्रत्यक्षात कृती करुन ही त्रुटी तपासून घ्यायला सांगितले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एखादी गोष्ट खटकली तर ती समोरासमोर बोलून दाखवायची अशी अजित पवार यांची कार्यपद्धती आहे. त्यांच्या याच स्वभावाचा परिचय पुन्हा एकदा आला आहे. पुणे सातारा महामार्गावरील सारोळे येथील, भोर तालुक्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि PDCC बँकेचे संचालक भालचंद्र जगताप यांच्या ई फोटेल या पंचतारांकीत हॉटेलच्या उदघाट्न अजित पवार यांच्या हस्ते झाले.


उद्घाटन केले आणि थेट चूक दाखवून दिली 


अजित पवार यांनी रिबीन कापून, दीप प्रज्वलन करत उदघाट्न करून हॉटेलची पाहणी केली. पाहणी दरम्यान हॉटेल रूम्सच्या बाथरूममध्ये असणारी स्पेस आणि शॉवरचं लोकेशन यासंबधी असणारी त्रुटी अजित पवारांच्या नजरेतून सुटू शकली नाही. त्रुटी लक्षात येताच अजित पवार यांनी हॉटेलच्या संचालकांनाच बाथरूममध्ये अंघोळ करण्याची कृती करायला सांगून मिश्किलपणे तिथं असणारी त्रुटी दाखवून दिली.


अजित पवारांनी कार्यक्रम स्थळी स्वत: कचरा उचचला


अजित पवारांच्या या चाणाक्ष नजरेला आणि त्यांच प्रत्येक गोष्टीत असणाऱ्या बारीक निरीक्षणाला उपस्थितांनी दाद दिली. त्यांच्यामध्ये असणाऱ्या अभ्यासू वृत्तीचा आणि मिश्किल पणाचा प्रत्यय बारामतीच्या नागरिकांना आला होता. स्वच्छतेच्या बाबतीत शिस्तप्रिय असलेल्या अजित पवारांची शिस्त बारामतीकरांनी अनुभवली. बारामती दौ-यादरम्यान अजित पवारांनी कार्यक्रम स्थळी स्वत: कचरा उचलत परिसराची साफसफाई केली. अजित पवारांना कुठंही कचरा  दिसला तर ते अधिकारी आणि कार्यकर्त्यांची कानउघडणी करतात.. मात्र यावेळी त्यांनी स्वता कचरा उचलून अधिकारी आणि कार्यकर्त्यांना कृतीतून स्वच्छतेचे धडे दिले. 


बारामतीकरांची कामे करता करता डोक्यावरचे केस गेले


अजितदादा आपल्या बेधडक विधानासाठी नेहमीच प्रसिद्ध आहेत. असच एक विधान अजितदादांनी केले होते. आपण कधी फेटा बांधत नाही, फेटा बांधायला केसपण राहिले नाहीत,  सगळे गेले.  तुम्हा बारामतीकरांची कामे करता करता माझी डोक्यावरचे केस पण गेले. असं अजित पवारांनी मिश्किल पणे  म्हणताच सभागृहात प्रचंड हशा पिकला. बारामतीत  बारामती तालुका मराठा सेवा संघ व जिजाऊ सेवा संघाच्या वतीने राजामाता जिजाऊ आणि बाल शिवाजी यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावर  करण्यात आलं. या कार्यक्रमाला अजित पवार आणि सुनेत्रा पवार उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.