मुंबई : राज्यात कोरोनाच्या ( Coronavirus in Maharashtra) दुसऱ्या लाटेचा जोर ओसरत असताना चिंता करणारी बातमी हाती आली आहे. दोन दिवसानंतर कोरोना रुग्णसंख्येत वाढ (Corona Patient growth) झाली आहे. राज्यात दिवसभरात 10 हजार 66 कोरोनाबाधित आढळून आलेत. ( Corona outbreak in Maharashtra) सोमवारी हा आकडा 6 हजारांच्या घरात गेला होता. मात्र त्यानंतर सलग दोन दिवस दोन-दोन हजारांची वाढ चिंता वाढवणारी आहे. आज दिवसभरात 163 रुग्णांचा मृत्यू झाला. तर 24 तासांमध्ये 11 हजार 32 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील  61 लाख 34 हजार 856 नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. मध्यप्रदेशात आजही संध्याकाळी सात वाजेपर्यंत 10लाख 85 हजार 076 लोकांचे लसीकरण झाले. तर कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने आज सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी उच्चांकाची नोंद करीत 6 लाख 2 हजार 163 नागरिकांना लस दिली. एकाच दिवशी एवढ्या संख्येने लस देण्याची आतापर्यंतची ही सर्वात मोठी संख्या आहे.  काल एकाच दिवशी 5 लाख 52 हजार 909 जणांना लसीकरण करून आतापर्यंतचा उच्चांक नोंदविला होता. लसीकरणात सातत्य टिकवत महाराष्ट्र देशात अग्रस्थानी आहे. आतापर्यंत सुमारे 2 कोटी 91 लाखांहून अधिक लस मात्र राज्यात देण्यात आल्या आहेत.


दरम्यान, डेल्टा प्लस व्हेरियंट ही राज्यासाठी चिंतेची बाब असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. डेल्टा प्लसचे सात जिल्ह्यात 21 रुग्ण असल्याचे त्यांनी नमूद केले. हा व्हेरिएंट वेगाने पसरत असल्याचेही त्यांनी सांगितले. या रुग्णांसाठी वेगळे वॉर्ड तयार करण्यात येत असल्याची माहिती टोपेंनी दिली. दरम्यान, रत्नागिरीत डेल्टा प्लसचे जास्त रुग्ण आढळून आले आहेत. संगमेश्वरमधील चार गावांत जास्त धोका असल्याने तेथे आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.