परभणीत सुकाणू समितीच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार, शेतकरी जखमी
सुकाणू समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्यास अटकाव केला. यादरम्यान पोलिसांनी शेतक-यांवर लाठीचार्ज केला. यात अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. यामुळे तीव्र संपात व्यक्त करण्यात येत आहे.
परभणी : सुकाणू समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्यास अटकाव केला. यादरम्यान पोलिसांनी शेतक-यांवर लाठीचार्ज केला. यात अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. यामुळे तीव्र संपात व्यक्त करण्यात येत आहे.
शेकडो शेतकऱ्यांना यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू झालीय. लाठीचार्जचा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट केल्याच्या संशयावरून पोलिसांनी काहींचे मोबाईलही जप्त केले आहेत.
दुसरीकडे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ध्वजारोहण करून नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. सुकाणू समितीच्या आंदोलनाविषयी विचारलं असता शेतकऱ्यांमध्ये संभ्रम असल्याचं पाटील म्हणाले.