जहांगीर हॉस्पिटलच्या नर्सिंग स्टाफचं आंदोलन, जवळपास 300 जण सहभागी
हॉस्पिटल प्रशासन अन्याय करत असल्याचा आरोप
पुणे : पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलचा नर्सिंग स्टाफ रस्त्यावर आला आहे. जहांगीर हॉस्पिटल प्रशासन अन्याय करत असल्याचा आरोप नर्सिंग स्टाफने केला आहे. चार महिन्यांपासून हॉस्पिटल प्रशासन अन्याय करत असल्याने नर्सिंग स्टाफ आक्रमक झाला आहे. जवळपास तिनशे लोकं हॉस्पिटल समोरील आंदोलनात सहभागी झाले आहेत.
पगार कमी देणे, कुलिंग टाईम नाही, १२ तास ड्युटी, काम करायची सक्ती, राजीनामा स्वीकारत नाही असे आरोप या नर्सिंग स्टाफने केला आहे. जहांगीर हॉस्पिटल कोव्हीड आणि नॉन कोव्हीड हॉस्पिटल आहे. हॉस्पिटल प्रशासन होस्टेलवर येऊन धमक्या देत असल्याचा आरोप स्टाफने केला आहे. तसेच एचआर स्टाफला शिवीगाळ करत असल्याचा आरोप देखील स्टाफकडून होत आहे.