मयुर निकम, झी मीडिया, वानखेड: तुम्ही पोश्टर बॉईज (Poster Boyz Marathi Movie) हा मराठी सिनेमा नक्कीच पाहिला असेल. या सिनेमात एका पोस्टरमुळे तिघा जणांची आयुष्य बरबाद होण्याच्या मार्गावर होतं. परंतु नंतर सिनेमात सगळे गैरसमज दूर होऊन सिनेमा हॅप्पी एन्डिंगनं गेला. परंतु सध्या एका गावात अशीच एक विचित्र घटना घडली आहे. या ठिकाणी मात्र खरोखरच गावातील काही महत्त्वपुर्ण व्यक्ती गायब झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना शोधण्यासाठी सध्या गावात पोस्टर मोहिम सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या पोस्टर लावून त्या हरवलेल्या लोकांना शोधून आणण्याची जबाबदारी ग्रामस्थांनाची आहे. त्यांनी त्या लोकांना शोधून आणलं तर त्यांना चांगली रक्कमही मिळणार आहे. (agricultural assistants went missing the villagers put up posters on the wall of the Gram Panchayat)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमच्या गावचे कृषी सहायक बेपत्ता झाले आहेत, त्यांना शोधून देणाऱ्यास पाचशे रुपयांचे बक्षीस दिले जाईल’ असे पोस्टर संग्रामपूर तालुक्यातील वानखेड ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीवर चिटकविण्यात आले आहे. यामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. शेती, शेतकरी (Farmers) आणि कृषी विभाग यांच्यातील दुवा म्हणून कृषी सहायक गावागावात कार्यरत असतात. त्यांच्यामार्फत अनेक योजना शेतकरी, ग्रामस्थांना कळतात. पण तेच बेपत्ता आहेत. यामुळे शेतकऱ्यांना कृषी विभागाचे मार्गदर्शनच मिळत नसल्याचे दिसते, याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.


काय आहे नेमकी घटना? 


संग्रामपूर तालुक्यातील वानखेड (Vankhed) आणि दुर्गादैत्य या साझाकरिता एक कृषी सहायक असून ते अनेक दिवसांपासून बेपत्ता आहेत. शेतकरी कार्यालयात चकरा मारून थकले, पण कृषी सहायक काही मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी विभागाचा योजनाचा लाभही मिळत नाही आणि मार्गदर्शन ही मिळत नाही. त्यामुळे कंटाळलेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या भिंतीवर कृषी सहायक दाखवा आणि पाचशे रुपये मिळवा, असे पोस्टर लावले आहे. यामुळे मात्र प्रशासनात खळबळ उडालीय.