अहमदनगर : कडेगाव पोटनिवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस आणि शिवसैनिकांमध्ये झालेल्या हाणामारीत २ जणांचा मृत्यू झाला आहे. यात संजय कोतकर, वसंत ठुबे यांचा २ जणांना गोळ्या घालण्यात आल्या, कोयत्याने वार करण्यात आले, त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणावर झी २४ तासशी बोलताना दिलीप सातपुते यांनी सांगितलं, की मला संजय कोतकर यांचा शरीरारात गोळ्या घातल्या असताना फोन आला आणि त्याने मला सांगितलं की मला कुणी मारलं. मला गोळ्या घालण्यात आल्या आहेत असं संजय कोतकर यांनी आपल्याला फोन करून सांगितल्याचं त्यांनी सांगितलं.


दिलीप सातपुते यांना मृत संजय कोतकर यांनी, कोणती नावं सांगितली, ते तुम्ही या व्हिडीओतच ऐका.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 



दिलीप सातपुते यांनी शिवसैनिक दुहेरी हत्या प्रकरणात सांगितलेल्या आरोपींच्या नावाची आणि आरोपांची झी मीडिया पुष्टी करत नाही.


काय झालं होतं त्या दिवशी शहरात... थोडक्यात


कडेगाव पोटनिवडणूक निकालानंतर प्रचंड हाणामारी झाली, ही हाणामारी २ चौकात सुरू होती, यात दोन शिवसैनिकांवर कोयत्याने वार करण्यात आले आणि गोळ्या देखील झाडण्यात आल्या. भर चौकात दोन शिवसैनिकांचे मृतदेह पडलेले होते. अहमदनगर शहरात ही बातमी पसरली आणि अख्ख्या शहरातील बाजारपेठा धडधड बंद पडल्या. शहरात भीतीचं वातावरण पसरलं. या हाणामारीत २ शिवसैनिकांना राजकारणामुळे आपला जीव गमवावा लागला. सोशल मीडियावर झाकलेल्या मृतदेहाच्या बाजूला एकजण रडत असल्याचा व्हीडीओ व्हायरल झाला, शहरात अनेक वाहनांची देखील तोडफोड करण्यात आल्याचं चित्र होतं.