सोलापूर : विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्याचा निर्णय घेतला असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. नागपूर धनगर आरक्षण मेळाव्यात ते बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान धनगर आरक्षणामुळे आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची ग्वाही त्यांनी यानिमित्तानं दिली. तर टाटा समाज विज्ञान संस्थेनं तयार केलेला अहवाल आता अंतिम टप्प्यात आला असून, तो डिसेंबर महिनाअखेर मिळेल अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. 


दरम्यान ३० वर्षांत जे मिळाले नाही ते फडणवीस सरकारनं ३ वर्षांत देण्याचा प्रयत्न केला अशा शब्दांत महादेव जानकर यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं. महाराष्ट्र राज्य  धनगर समाज संघर्ष समितीच्यावतीने नागपुरात धनगर आरक्षण मेळावा आयोजित करण्यात आला, त्यात ते बोलत होते.