Ahmednagar Congress Committee dismissed : अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar ) राजकारण आता ढवळून निघत आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीत काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आहे. त्यामुळे काँग्रेसने तडकाफडकी मोठा निर्णय घेत काँग्रेसची कार्यकारणी (Congress Committee ) बरखास्त केली आहे. जिल्हाध्यक्षने स्वतःहून राजीनामा दिलेला नाही, तर आम्ही त्याच्यावरती निलंबनाची कारवाई केलेली आहे. (Maharashtra Political News) कारण त्यांनी बंडखोर सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांना पाठिंबा दिला आहे, अशी माहिती प्रदेशचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)  यांनी दिली आहे. (Political News in Marathi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सत्यजीत तांबेंच्या अपक्ष उमेदवारीमुळे आधीच काँग्रेसला धक्का बसला आहे. त्यातच आता अहमदनगरचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळुंखे यांनी तांबे यांच्या समर्थनार्थ राजीनामा दिला. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्थानिक काँग्रेस कार्यकारणीच बरखास्त केली. त्यामुळे अंतर्गत गटबाजीचा विचार केल्यास एकप्रकारे बाळासाहेब थोरात यांनाच हा धक्का मानला जात आहे.


अहमदनगर जिल्ह्यात बाळासाहेब थोरात यांचे वर्चस्व


अहमदनगर जिल्ह्यात काँग्रेस पक्षात ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे वर्चस्व आहे. स्थानिक अध्यक्षासह अनेक पदाधिकारी त्यांचेच समर्थक आहेत. त्यामुळे ही कार्यकारिणी बरखास्त करुन पटोले यांनी थेट थोरात यांनाच धक्का दिल्याचं बोललं जात आहे. काँग्रेसने नाशिकमधून डॉ. सुधीर तांबे यांना अधिकृतपणे उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, त्यांनी उमेदवारी अर्ज न भरता मुलासाठी माघार घेतल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, सुधीर तांबे यांचा मुलगा सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरत काँग्रेसला जोरदार धक्का दिला. घरात उमेदवारी मिळाली असताना सत्यजित तांबे यांनी बंडाचे निशाण फडकवले. तसेच सत्यजित यांना भाजपचे छुपे समर्थन असल्याचे दिसून येत आहे. 


जिल्ह्याच्या राजकारणात यामुळे नवा ट्विस्ट


सत्यजित हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा होती. त्यामुळे ते भाजपचे उमेदवार असतील अशी शक्यता व्यक्त होत होती. मात्र, त्यांनी अपक्ष उमेदवारी भरुन एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे भाजपने आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगात उतरवलेला नाही. त्याचवेळी ज्यांना उमदेवारी देण्याचे कबुल केले होते त्या भाजपच्या नेत्या शुभांगी पाटील यांनी भाजपने एबी फॉर्म दिला नाही. त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवार भरला आणि ठाकरे गटाचा पाठिंबा मिळवत भाजपलाच आव्हान दिले. आता त्यांना महाविकास आघाडीच्या पाठिंबा मिळाला आहे. त्याचेवळी काँग्रेसचे जिल्ह्या कमिटी बरखास्त झाली आहे. त्यामुळे काँग्रेसची मते कोणाला मिळतात, याची उत्सुकता आहे.