अहमदनगर :  नगरमध्ये राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरचं इमर्जंन्सी लँडिंग करण्यात आले. हेलिकॉप्टरचा सीटबेल्ट बाहेर राहील्यानं हॅलिकॉप्टर तातडीनं उतरवल्याचे प्राथमिक वृत्त समोर येत आहे. पण या एमर्जन्सी लॅंडीगमुळे पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. जिल्हा मराठा समाज प्रचारक शाळेचा शतक महोत्सवी सोहळा आज नगरमध्ये होता. या कार्यक्रमात शरद पवार प्रमुख पाहुणे होते. शाळेच्या मैदानात कार्यक्रमाच्या ठिकाणी त्यांचे हेलीकॉप्टर होते.


सीटबेल्ट दरवाजाबाहेर 


साडेतीनच्या दरम्यान सर्व कार्यक्रम संपल्यानंतर शरद पवार निघताना हॅलीकॉप्टरमध्ये जाऊन बसले आणि काही वेळातच हॅलीकॉप्टरने टेकऑफ घेतला. आणि काही वेळातच त्याचे पुन्हा लॅंडीग झाले. दरम्यान पोलिसांची चांगलीच धावपण उडाली. नेमके काय झाले ? हे न कळाल्याने सुरूवातीला गोंधळ उडाला.  पण हे प्रकरण गंभीर नसल्याचे समजताच साऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. सीटबेल्टचा काही भाग दरवाज्याच्या बाहेर असल्याचे हॅलीकॉप्टरने टेक ऑफ घेतल्यानंतर पायलटच्या लक्षात आले. त्यानंतर पाच ते दहा मिनिटांत हॅलीकॉप्टरचे एमरजन्सी लॅंडीग करण्यात आले होते.