अहमदनगर: निळवंडे धरणाच्या पाण्याच्या  मुद्द्यावरुन अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांमध्ये वाद सुरु झालाय. 


 संघर्ष समितीचं रास्तारोको आंदोलन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निळवंडे धरणाच्या  कालव्यांना तातडीनं निधी उपलब्ध करुन द्यावा या मागणीसाठी संगममेर तालुक्यातील तळेगांव दिघे इथं पाटपाणी संघर्ष समितीनं रास्तारोको आंदोलन केलं.


आमदार बाळासाहेब थोरात यांची आपल्याच पक्षाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका


यावेळी काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात यांनी आपल्याच पक्षाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका केलीय. निळवंडे धरणातून कोपरगाव आणि शिर्डीला  पाईपलाईन द्वारे  पाणी पुरवठा केला जाणार आहे.यावर थोरात यांनी अक्षेप घेतला आहे.