COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अहमदनगर : अहमदनगरच्या एका शिल्पकाराने साईबाबांची सात फुटी निद्रिस्त मूर्ती साकारलीय. अमेरिकन वॅक्स सिलीकॉन मटेरिअलचा वापर करुन ही मूर्ती साकारण्यात आलीय. अविनाश सोनवणे असं या शिल्पकाराचं नाव आहे. जिवंत वाटणारे डोळे आणि पांढरी चमकदार दाढी मूर्तीच्या जीवनपणात अजून चैतन्य भरते. पायांच्या नखापासून डोळ्यांपर्यंत प्रत्येक गोष्ट अत्यंत सुबक आखीव रेखीव आहे. 


ही मूर्ती बनवण्यासाठी सोनवणे यांना एक ते दीड महिन्यांचा कालावधी लागला. ही मूर्ती हैदराबादच्या एका झोपाळ्यावर विराजमान होणार आहे.